सोलापूरकरांचे आराध्यदैवत माता रूपाभवानी

तुळजापूर वेशीच्या सीमेवर असणारा विस्तीर्ण परिसर म्हणजे भवानीपेठ. असे नाव पडले ते देवी रूपाभवानीमुळे. सोलापूरचे दैवत असलेल्या रूपाभवानीमातेचे रूप तुळजापूरच्या तुळजाभवानीशी मिळते-जुळते असल्याने या देवीला रूपाभवानी असे म्हटले जाऊ लागले. सुरुवातीला अगदी छोट्या जागेत असणार्‍या देवीचे मंदिर आज भव्य झाले असून दीड एकर परिसरात सभामंडप, महाद्वार आणि मंदिराभोवतीचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. सोलापूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या रूपाभवानी मातेचा दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

महाराष्ट्र व कर्नाटकातून दरवर्षी  घटस्थापनेसाठी ज्योत घेऊन जायला  शेकडो नवरात्र मंडळे व हजारो युवक येत असतात. हे तरुण आळीपाळीने ही ज्योत हाती घेऊन आपापल्या गावी प्रस्थान ठेवतात.

Share: