श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती

1100 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. सोलापुरामधील खरेदी-विक्रीचे व्यवहार हे पारदर्शक असल्यामुळे आणि या बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक काटे वापरले जात असल्यामुळे शेतकर्‍यांचा ओढा या बाजार समितीकडे आहे आणि त्यामुळे तिचे महत्त्व वाढत चालले आहे.

उत्तर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1959 मध्ये झाली. कुंभार वेशीतील अरुंद रस्त्यावर भुसार व अडते व्यापारी आले. दोन्ही तालुक्यांतील शेतकर्‍यांचा माल घेऊ लागले. त्याचा विस्तार आवश्यक वाटल्याने सहकारमहर्षी (कै.) वि. गु. शिवदारे यांनी हैदराबाद रस्त्यावर 100 एकर जमीन खरेदी केली. परंतु तिथे व्यापारी येण्यास इच्छुक नव्हते. त्यांना 10 हजार रुपयांत दुकाने दिली. त्यानंतर भुसार, अडते व्यापारी आले. समितीच्या विस्तारित जमिनीवर परप्रांतातूनही शेतमाल, भुसार माल येऊ लागला. महाराष्ट्रातील तिसर्‍या क्रमांकाची समिती झाली. आज वार्षिक 1100 कोटी रुपयांची उलाढाल करणारी ही समिती आहे. नाशिकच्या लासलगावनंतर सर्वाधिक कांदा या समितीच्या आवारात येतो. तिथून आंध्र, कर्नाटक, तमिळनाडूकडे जातो. बेदाण्याचे सौदे करण्यासाठी परप्रांतातील व्यापारी येतात. शेतकर्‍यांना सर्व सुखसोयी या समितीच्या आवारात आहेत.

Share: