नवीन धार्मिक पर्यटन केंद्र - वीरतपस्वी मंदिर

अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिर हे आता नवीन धार्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. येथील महाद्वार दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. या 7 मजली महाद्वाराची उंची 108 फूट आहे. मंदिराचे 3 भाग आहेत. तळमजल्यावर विशाल ध्यानमंदिर आहे. एकाच वेळी 1 हजार जण ध्यानाला बसू शकतील अशी व्यवस्था आहे. मंदिराचे शिखर अतिशय देखणे झाले आहे. जमिनीपासून कळसापर्यंतची उंची 108 फूट आहे. असे भव्यदिव्य मंदिर आणि महाद्वार महाराष्ट्रात अन्यत्र आढळून येत नाही.

Share: