शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व संस्था

सोलापूर शहर व जिल्हा शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा अग्रेसर होताना दिसत आहे. विविध नामवंत संस्थांची अनेक महाविद्यालये सोलापूर जिल्ह्यात आहेत.

पाचवीला असताना ओंकारने स्वतःची वेबसाइट तयार केली आहे. ब्लॉगवर लिहिण्यास सुरुवात केली. भारतीय मसाले या विषयावर त्याने लिहिलेल्या ब्लॉगला जास्त पसंती मिळाली.अखिल भारतीय व राज्य स्तरावरील अनेक शिक्षण संस्थांसह सोलापूर जिह्यातील अनेक शिक्षण संस्थांचे जिल्ह्याच्या शिक्षण विकासात योगदान राहिले आहे. जिल्ह्यात सर्वप्रकारचे मिळून 5 वैद्यकीय, 18 अभियांत्रिकी तर 25 हून अधिक तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. याशिवाय 110 इतकी वरिष्ठ महाविद्यालये आहेत. सुयश गुरुकुल, ज्ञानप्रबोधिनी आणि विठ्ठल शिक्षण संस्था यासारख्या संस्थांनी अल्पावधीत वेगळा ठसा निर्माण केला आहे. शालेय शिक्षणातसुद्धा अनेक अखिल भारतीय स्तरावरील नामवंत शिक्षण संस्था सोलापुरात आहेत. उदा. स्वामीनारायण गुरुकुल. जिल्हा परिषदेच्या वतीने जिह्यातील सर्वदूर गाव व वस्त्यांपर्यंत शिक्षण पोहोचले आहे.

रणजितसिंह डिसले हे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील परितेवाडीचे स्मार्ट मास्तर. फळा आणि खडूमध्ये अडकलेले परंपरागत शिक्षण त्यांनी बदलून टाकलं व क्युआर कोड आणि व्हर्च्युअल फिल्ड ट्रीपच्या उपक्रमातून शिक्षणपद्धतीला डिजिटल रूपडं दिलं. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांना मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट या किताबाने गौरविले आहे. व्हर्च्युअल ट्रीपच्या माध्यमातून त्यांनी परदेशातील गोष्टी दाखवल्या. असे करणारे देशातील ते पहिले प्राथमिक शिक्षक. आंतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून जगातील 30 ब्लॉगरमधून गुगलने सोलापूरच्या ओंकार जंजीरालची निवड केली आहे. त्याचा सत्कार अमेरिकेत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या हस्ते झाला. पाचवीला असताना ओंकारने स्वतःची वेबसाइट तयार केली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून त्याने ब्लॉगवर लिहिण्यास सुरुवात केली. भारतीय मसाले या विषयावर त्याने लिहिलेल्या ब्लॉगला जास्त पसंती मिळाली आहे. आजतागायत ओंकारने 3 हजार ब्लॉग लिहिले आहेत. भविष्यात गुगलसोबत डिजिटल मार्केटिंग करण्याचा मानस ओंकार जंजीराल याने व्यक्त केला आहे. तरुणांनी सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा इंटरनेटचा चांगला वापर केल्यास करिअर घडू शकते, असेही ओंकारने यावेळी सांगितले.

Share: