इडली-सांबार

कर्नाटकी सर्वमान्य प्रकार ङ्गइडली-सांबारफ ! तांदूळ भिजवून दुसरे दिवशी दगडी वाट्यावरवंट्याने रवाळ करून घेऊन उकडीच्या साच्यात वाफवले जाते. वाफाळलेल्या भुसभुशीत सच्छिद्र इडल्या पूर्णचंद्रबिंबाप्रमाणे शुभ्र व देखण्या दिसतात. जोडीला लाल तिखट व टोमॅटो, चिंचगूळ, मसाले, भोपळा आणि तूरदाळीचे खमंग ङ्गसांबारफ ! पातळशा सांबाराच्या बाऊलमध्ये या लुसलुशीत इडल्या बुडवून ताव मारावा वाटला नाही तरच नवल ! इडलीसांबार हेही एक सोलापुरात येऊन नक्की खावे असेच आहे.

Share: