श्री तीर्थ अरण

माढा तालुक्यातील अरण हे गाव श्री संत सावता महाराज यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावाचे आणि सावता महाराजांचेही वैशिष्ट्य असे की, ते पंढरपूरला कोणत्याही यात्रेच्या निमित्ताने जात नसत.  त्यांची पालखी आजही पंढरपूरला जात नाही. कारण पंढरपूरचा विठोबाच सावता महाराजांना भेटायला येत असे. या ठिकाणी आता सावता महाराजांचे मंदिर आहे आणि त्यांची जीवन कहाणी सांगणारे स्मृतिस्थळही निर्माण करण्यात आले आहे. सावता माळी यांची पुण्यतिथी तेथे मोठ्या प्रमाणावर साजरी होत असते आणि तिला भाविक मोठ्या संख्येने येत असतात. हे ठिकाण पुणे-सोलापूर मार्गावर

सोलापूरपासून 80 किलो मीटर अंतरावर आहे. याच तालुक्यात श्रीक्षेत्र रांझणी येथे ओंकारेश्वराचे मंदिर आहे, तर लऊळ येथे श्री पांडुरंगाचे निस्सिम भक्त असलेल्या संत कूर्मदासांचे मंदिर आहे.

Share: