जिल्ह्यात 75 हजार एकरवर डाळिंब

डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी लोहयुक्त संकरित वाणाचा शोध लावला असून, त्यास ङ्गसोलापूर लालफ हे नाव दिले आहे. हे वाण ङ्गसोलापूर लालफ नावाने जगभरात पोहोचले आहे.

डाळिंबाची लागवड 1974 मध्ये झाली. तीही केवळ 2 एकरवर. डाळिंब हे पैसे देणारे पीक होईल असे तेव्हा कोणालाही वाटले नव्हते. 1972 च्या दुष्काळाने वाताहत झाली. काय करावे, हा प्रश्न होता. तेव्हा कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून डाळिंबाकडे सांगोला तालुक्यातील शेतकरी वळला. पहिले पीक आले. लाल रंगाचे डाळिंब पाहून मुंबईकर चकित झाले. तेथील व्यापारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञानांही या डाळिंबाने चकित केले. गणेश डाळिंब इतके चांगले येऊ शकते हे कुणालाच खरे वाटले नाही. हळूहळू पुढे दुष्काळी भागातील चित्र बदलू बले. पुढे शरद पवार हे मुख्यमंत्री असताना फळबाग लागवडीला उत्तेजन दिले. बँकांनी कर्जे देण्यास सुरुवात केली. आज जिल्ह्यातील 75 हजार एकरवर डाळिंब आहे. आज सोलापूर येथे डाळिंबावर संशोधन करणारे राष्ट्रीय स्तरावरील केंद्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोर, डाळिंब आखाती देशात निर्यात होऊ लागली तर कारीची द्राक्षे युरोेपात पोहोचली. वार्षीक सरासरी उलाढाल 1300 कोटी आहे.

Share: