करमाळा

करमाळा हे कमालादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर राऊराजे निंबाळकर यांनी इ.स. १७२७ साली बांधले. या देवीस तुळजापूरच्या तुळजा भवानीचा अवतार मानले जाते. या मंदिरात ९६ या अंकाचे खूप महत्त्व आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीने बांधलेल्या या मंदिराचे एक प्रवेशद्वार आग्नेय दिशेला तर दुसरे उत्तर दिशेला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यास ९६ खांब व ९६ खिडक्या आहेत. मंदिरात ९६ चित्रे आहेत व मंदिरातील विहिरीस ९६ पायऱ्या आहेत. येथे नवरात्रीचा सण खूप भक्तिभावाने साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपासून चतुर्थीपर्यंत येथे वार्षिक यात्रा असते.

Share: