अग्निहोत्र

१७ नोव्हेंबर २०१८ रोजी पुण्यामध्ये पंडित फार्मस् येथे सामूहिक अग्निहोत्र संपन्न झाले. अग्निहोत्र ही विविध वैज्ञानिक तत्वांचा एकत्रित उपयोग करून वातावरणाचे शुध्दीकरण करण्याची विशेष अशी एक प्रक्रिया आहे. याला होम किंवा अग्नि चिकित्सा म्हणूनही ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातील 'शिवापुरी' येथील अग्निहोत्र सुप्रसिद्ध आहे. याच अग्निहोत्राचा मंगल अनुभव पुण्यामध्ये घेता आला. मा. ना. श्री. सुभाष देशमुख (बापू) यांच्या सह ३०० जणांनी या कार्यात सहभाग घेतला. सोलापूर फेस्टच्या निमित्ताने पुण्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाची पवित्र अनुभूती घेतली.

Share: