कौशल्य विकसनातून औद्योगिक विकास अभियान


सोलापूरचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन निरनिराळे उपक्रम राबवित असते. औद्योगिक विकासातून सोलापूरची प्रगती साधावी असा हेतू ठेवून सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे ४ मार्च रोजी कौशल्य विकसनातून औद्योगिक विकास अभियान राबविण्यात आले.

  • सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी
  • अक्कलकोट रोड एमआयडीसी
  • इंडियन मेडिकल असोसिएशन
  • सोलापुर चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन

यांचे सदस्य व पदाधिकारी यांना मार्गदर्शन व चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील यशस्वी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासन पुरस्कृत नीम तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान याअंतर्गत विविध उपक्रमांची माहिती तसेच सोलापूर सोशल फाउंडेशनच्या प्लेसमेंट विभागासोबत एकत्र काम करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर येथे तर दुपारी ४.०० वाजता चिंचोली एमआयडीसी, पुणे रोड, सोलापूर येथे बैठक घेण्यात आली.

Share: