सोलापूरचा सर्वांगीण विकास आणि त्यासाठी पुण्यातील सोलापूरकरांची एकजूट घडवून आणण्याच्या दृष्टीने सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्याला पुण्यातील सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. काल, रविवार दि. १६ डिसेंबर रोजी पंडित फार्मस्, पुणे येथे सहकार मंत्री मा. ना. श्री सुभाष (बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.