वॉलहँगिंग अर्थात कलाकुसर

यंत्रमागावरील अतिरिक्त धागे गुंडाळून वजनावर विकण्याचे काम पूर्वी व्हायचे. तो कॉटन वेस्ट म्हणून विकला जाई. साठच्या दशकात भूमय्या दूधगुंडी यांनी त्यावर तोडगा काढला. या धाग्यांपासून त्यांनी हातमागावर शबनम बॅग विणली. झाले, ही बॅग इतकी प्रसिद्ध झाली की पत्रकार, लेखकांच्या खांद्यावर जाऊन बसली. प्रतिष्ठा मिळाल्याने त्याचे उत्पादन वाढले. साहजिकच यंत्रमागधारकांकडील अतिरिक्त धागे चांगल्या भावात विकले जाऊ लागले. दुसरीकडे हातमागावरील शबनम जाऊन कटवर्किंग सुरू झाले. म्हणजेच भिंतीवर टांगण्याची येणारी कलाकुसर. त्यानंतर थेट हातमागावर प्रतिमा विणण्यास सुरुवात झाली. देव-देवता, थोर महापुरुष, सिनेअभिनेते यांच्या प्रतिमा हातमागावर तयार होऊ लागल्या. हा चमत्कार केवळ सोलापुरातील कलावंतांचा आहे. सोमा, जिंदम यांनी ही कला अवगत केली. सोलापूरचे नाव उंचावले.

Share: