आरोग्यवर्धिनी शेंगा पोळी

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेंगा पिकतं. या शेंगदाण्यांपासून केला जाणारा भन्नाट प्रकार म्हणजे शेंगा पोळी. सोलपूरच्या पदार्थांचे वैशिष्ट्य म्हणजे किमान पदार्थ वापरून चवदार पदार्थ बनवायचे. त्याप्रमाणे भाजलेल्या शेंगा व गूळ एकत्र कुटून पोळी लाटून शेंगा पोळ्या बनवतात. यावर तूप लावून खाणे म्हणजे स्वर्गसुखच.

शेंगापोळी हे सोलापुुरी खाद्यविश्वातील चवदार गोड नाव. खमंग भाजलेल्या शेंगांचा जाडसर कूट व गुळाच्या घोलाण्याचे सारण घालून शेंगापोळी गोलाकार घेते. शुद्ध लोणकढ्या तुपाबरोबर ही पोळी जिभेला लाडावून ठेवते. हिमोग्लोबीन वाढवणार्‍या पौष्टिक व लज्जतदार शेंगापोळीला आरोग्यवर्धिनी असे गौरवाने म्हणावे लागेल.

Share: