धाराशिव लेणी

उस्मानाबादचे जुने नाव धाराशिव होय. या नावावरूनच आणि पुरातत्त्वीय भाषेत तेथील लेणी धाराशिव लेणी या नावाने ओळखली जातात. धाराशिव शहराच्या ईशान्येस सुमारे आठ किलोमीटर अंतरावर बालाघाटच्या डोंगरामध्ये ही लेणी आहेत. एका बाजूला चार आणि दुसर्‍या बाजूला तीन अशी एकूण सात लेणी दिसतात.

मुनी, कनकामरलिखित करकंडचरिऊ आणि बृहत्कथाकोश या ग्रंथात धाराशिव शहराचा आणि धाराशिव लेण्याचा सर्वात प्राचीन उल्लेख आहे. येथे एकंदरीत सात लेणी आहेत. त्यापैकी चार लेणी एका बाजूला असून तीन लेणी त्यांना काटकोन करणार्‍या डोंगरात आहेत. प्राचीन लेण्यामध्ये धाराशिव लेणीचे स्थान आगळे आहे. परंडा, तेर, तुळजापूर, धाराशिव लेणी या स्थळांना येथून सहज भेट देता येतो. शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलाई नावाने ओळखले जाते. तसेच धारासुरमर्दिनी मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिरसुद्धा पर्यटकांना आकर्षित करते.

Share: