विजयपूर

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करत असताना आदिलशाह आणि त्याची राजधानी विजापूर या शहराचा उल्लेख आपण इतिहासात वाचलेला. सोलापूरच्या जवळ असलेले कर्नाटक राज्यातील हे शहर गोलघुमटसाठी प्रसिद्ध आहे. खरे तर ही इमारत म्हणजे मुहम्मद आदिलशाहचे थडगे. संपूर्ण वास्तूची उंची 68 मीटर आहे. मुख्य घुमटाच्या आतील भागात सव्वातीन मीटरचा सज्जा असून तिथे उभे राहून बोलले असता सात प्रतिध्वनी उमटतात. या घुमटाच्या एका बाजूला घड्याळ लावल्यास दुसर्‍या बाजूला टिक टिक ऐकू येते. म्हणून त्यास ङ्गबोल घुमटफ असेही म्हणतात.

अलिकडच्या काळात उभारण्यात आलेले विजापूर शहरापासून जवळ असलेले शिवगिरी येथील भव्य शंकराची मूर्ती लांबूनच लक्ष वेधून घेते. विजापूर शहरातील जैन मंदिरही पाहण्यासारखे आहे. शहराजवळील एका जैन मंदिरात सहस्त्र फणा असलेली अखंड दगडातील मूर्ती आहे.

Share: