शॉर्ट फिल्म स्पर्धा


शॉर्टफिल्मच्या माध्यमातून सोलापूरचे ब्रॅंडिंग!
सोलापूर जिल्हा व शहराचे देशपातळीवर ब्रॅंडिंग व्हावे व त्यायोगे प्रगति साधली जावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन नेहेमीच प्रयत्नशील राहिले आहे. जनतेचाही या कार्यात सहभाग व्हावा व अधिकाधिक सोलापूरकरांनी फाऊंडेशनसह जोडले जावे यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धा घेतल्या जात असतात. या विधायक उपक्रमात तरुण पिढीनेही सहभागी व्हावे यासाठी शॉर्टफिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मोबाईल तसेच कॅमेरा या दोन्ही माध्यमांद्वारे स्पर्धकांना शॉर्टफिल्म तयार करता येईल. मोबाईलमध्ये ३ मिनिटे तर कॅमेरामध्ये ६ मिनिटांची शॉर्टफिल्म स्पर्धकांनी बनवायची आहे.

शॉर्ट फिल्मसाठी विषय
1. सोलापूरचे रस्ते
2. सोलापूरातील स्वस्ताई
3. सोलापूरी भाषा
4. सोलापूरचे कामगार, पुढारी
5. सोलापूर - शैक्षणिक हब
6. सौंदर्य, ब्युटी पार्लर
7. सोलापूरचं शहर पर्यटन - डॉ. कोटणीस, शुभराय - शंकर महाराज,
सिद्धरामेश्वर, पाखर संकुल, केतू मंदीर, महानगरपालिका, तलाव, किल्ला, नळदुर्ग, विजापूर, आपलं घर, पंढरपूर - नवरंगे अनाथालय
8. सोलापूरची लोककला - १) भारूड (भार्गी)     २) पंढरपूर (तिवाडी मॅम )
9. सोलापूरचे व्याख्याते - १)शेटे  २) रामतिर्थकर 
३) सुहास पुजारी   ४) अरविंद जोशी   ५) विशाल गरड
10. सोलापूरातील हेरिटेज
11. अॅग्रो / कृषीक्षेत्र - डाळिंब, कांदा, हुरडा पार्टी
12. साखर कारखाने
13. रेशमी साड्या, कांबळी, हातमाग साडया, चादरी, टॉवेल्स
14. कुचन प्रशाला - 100 वर्षे भारतातील
15. वाचनालय - हिराचंद नेमचंद
16. हत्तरसंग कुडल
17. वेळापूर - अर्धनारी नटेश्वर
18. अध्यामिक सोलापूर
19. अन्नदान योजना

शॉर्ट फिल्मसाठी विषय

20. विवाह सोहळा
21. पक्षी पर्यटन
22. स्मार्ट सिटी
23. चांगलं, उत्तम ते सर्व आणि अजून चांगलं काय होऊ शकतं?
24. बसवकल्याण - बसवेश्वरांचा मंगळवेढा
25. संतभूमी
26. शासकीय कार्यालय - १) पासपोर्ट   २) साखर आयुक्त प्रादेशिक कार्यालय
27. राष्ट्रीय डाळिंब संशोधन आणि मार्केटिंग
28. कस्पटे - सीताफळ
29. उजनी धरण
30. रेल्वे
31. घरकुल योजना - आशिया खंड
32. सुंदरी वादक - भीमण्णा जाधव
33. दिपक देशपांडे
34. सिद्धेश्वर वनविहार
35. केमचे कुंकु
36. सोलापूरचे खाद्यपदार्थ - व्हेज - नॉनव्हेज
37. सोलापूरातले मोठे उद्योग
38. अकलूजचा घोडेबाजार
39. अकलूजची शिवशाही
40. रेकॉर्ड कलेक्टर लायब्ररी

यांपैकी कोणताही किंवा याव्यतिरिक्त सोलापूरशी निगडीत असणारा इतर कोणताही विषयही आपण शॉर्ट फिल्मसाठी निवडू शकता.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे दिलेला फॉर्म संपूर्ण भरून सबमीट करावा. फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा... शॉर्टफिल्म स्पर्धा

Share: