'श्रीमंती सोलापूरची' पुस्तक प्रकाशन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरची माहिती आणि महती सांगणारे कॉफी टेबल बुक 'श्रीमंती सोलापूरची' चे पुण्यामध्ये १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशन झाले. 'सोलापूर सोशल फाऊंडेशन' ही संस्था सोलापूरसाठी काही चांगलं करण्याची इच्छा बाळगणार्‍या सोलापूरप्रेमींना एकत्र आणून सोलापूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणजे 'श्रीमंती सोलापूरची' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन. सोलापूर जिल्ह्याला अतिशय समृद्ध असा ऐतिहासिक, धार्मिक, व्यावसायिक वारसा लाभला आहे. या जिल्ह्याचा किमान १००० वर्षांचा इतिहास उपलब्ध आहे. ही सर्व माहिती एखाद्या १०० पानी ग्रंथातून मांडणे खरेतर अशक्यच. परंतु या पुस्तकाच्या निमित्ताने हा खजिना लोकांसमोर आणण्याची ही एक सुरुवात झाली असे मानता येईल. पुण्यामध्ये पंडित फार्मस् येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला.

Share: