मंगळवेढा

मंगळवेढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आणि तालुक्याचे गाव आहे.. मंगळवेढा हा मंगळवेढे या नावानेही ओळखला जातो. 

मंगळवेढे हे गाव सोलापूरपासून ५४ किलोमीटर तर पंढरपूरपासून २३ किलोमीटर अंतरावर आहे. दूरवर पसरलेली काळी जमीन ही मंगळवेढ्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून हीच मंगळवेढे नगरी प्रसिद्ध आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्य

मंगळवेढ्यात सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मारोळी या गावामधील गैबीपीरच्या दर्ग्याला मुस्लिमांबरोबरच हिंदु भाविक ही जातात. तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. जवळ जवळ २५ नवरात्र मंडळे या गावात आहेत. डेकोरेशन, हालते देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतात. या तालुक्यातील लक्ष्मी-दहिवडी या गावामधे सर्वधर्मीय दुर्गामाता नवरात्र महोत्सव तरुण मंडळ आहे. या मंडळात सर्व समाजाचे (मुसलमान, धनगर, वडार, कैकाडी, महार, मांग, चाभार, कुंभार, सुतार, लोहार, पारधी, लिगायत, वाणी) लोक एकत्रितपणे सर्व सण साजरे करतात. संत दामाजीपंत हे या गावचे रहिवासी होते .

संताची भूमी

संत दामाजी, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत गोपाबाई, स्वामी समर्थ, संत बसवेश्वर महाराज, बाबा महाराज आर्वीकर, संत बागडे महाराज मारोळी, माचणूर सिताराम महाराज असे अनेक थोर संत येथे होऊन गेले. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचेसुद्धा चरणस्पर्श या संत भूमीला लाभले आहेत. शिवाजी महाराजांनी मंगळवेढ्यात चार दिवस मुक्काम केला होता.

Share: