बार्शी

बार्शी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका उस्मानाबाद जिल्हालगत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून यास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते.

बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे.बार्शी हे शहर कला,क्रीडा,शिक्षण,वैद्यकीय,औद्योगिक,सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे.बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.

भगवंत मंदिर

जुन्या काळी "भगवंताची नगरी" म्हनुन बार्शी ची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले.तसेच संपूर्ण आशिया खंडातील हेमाड हया पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे. मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे.गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पुर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर एका भगवंत भक्ताची समाधी आहे. एकूण 12 भगवंताची मंदिरे असल्यामुळे बार्शी हे नाव पडल्याची आख्यायिका आहे.

इतर आकर्षणे

बार्शी शहरापासून २३ कि.मी वर श्री संतनाथ नगरी आहे. ज्‍याला वैराग असे म्‍हटले जाते. वैराग हे वैराग्‍याची भुमी म्‍हणुन ओळखले जाते. येथे श्री संतनाथ महाराज यांची समाधी आहे. वैरागचा दर बुधवारी बाजार भरतो. वैराग मधील शेळीचा बाजार प्रसिद्ध आहे. वैराग हे ठिकाण आता एक शिक्षणाच्‍या दष्‍टीने वाडत आहे. येथे सौ. सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदीर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. वैराग मध्‍ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे.

वैराग पासुन १३ कि.मी वर माढा रोड वर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदीर आहे. हे मंदीर भव्‍य असुन या देवी ची अशी कथा सांगितली जाते कि या देवी ची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्‍यावेळी तळहता एवढया आकाराची होती, व सध्‍या हि मुर्ती 5 ते साडे पाच फुड एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्‍या देवी प्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्‍या देवी प्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पुर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता हि जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकर्यांची खुप श्रध्‍दा आहे. भगवती माते ची मिरवणुक ही भव्‍या असते. गावच्‍या यात्रेस परगाव चे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन,यावली व ढोराळे गावान‍जीक आहे.

श्री निलकंठेश्वर मंदिर,पांगरी ता.बार्शी

बार्शी शहरापासुन 22 कि.मी.अंतरावर पुणे-लातूर राज्यमार्गावर पांगरी या निमशहरी गावाजवळ जागृत असे निलकंठेश्वर मंदिर आहे. प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिण्यात व पोर्णिमा,अमावस्या, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते.

Share: