नलदमयंतीशी नाते सांगणारे नळदुर्ग

गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्यात आता मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण झाले असून ध्वनी व प्रकाश शो, बोटिंग व वॉटर स्पोर्ट, म्युझिकल फाऊंटन, बागबगिचा यामुळे पर्यटकांची संख्या वेगाने वाढत आहे. या किल्ल्याचा व्यवस्थित आनंद घ्यायचा तर यासाठी एक दिवस हवाच.

डोंगरकड्यातून वाहणार्‍या नदीच्या तिरावर अतिशय कल्पकतेने बांधलेला एकमेव किल्ला. पुराणकाळातील नल-दमयंतीच्या तरल प्रेमभावनेशी नाते सांगणारा हा किल्ला नल राजाने आपल्या मुलासाठी बांधल्याचा उल्लेख तारीख ए फरिस्ता या ग्रंथात आहे. सोलापूर हैदराबाद महामार्गाला लागूनच असलेला हा किल्ला सोलापूरपासून 45 किलोमीटरवर आहे. किल्ल्यातील नर-मादी धबधबा दरवर्षी पावसाळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करत असतो.

उपलब्ध नोंदीनुसार या किल्ल्याला किमान 1500 वर्षांचा इतिहास आहे. चालुक्य राजा कीर्तीवर्मन याने सन 567 मध्ये हा किल्ला नल राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता. त्यानंतर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. सन 1351 मध्ये किल्ला बहामनी राज्याच्या ताब्यात गेला. नंतर विजापूरचा आदिलशहा, मुघल आदी घराण्यांची सत्ता आली. नतंर नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकला. देश स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलिस कारवाई करून मराठवाडा भारतात समाविष्ट करून घेतला अन् किल्ला मुक्त झाला.

भूगर्भ शास्त्राच्या अभ्यासकांना या किल्ल्याचा परिसर नेहमीच खुणावतो. अतिशय दुर्मिळ असा कॉलमनार जॉइन्टस् प्रकारचा खडक येथेच पाहायला मिळतो. मुख्य किल्ला आणि रणमंडळ हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महलने जोडलेले आहेत. बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महालाची योजना केलेली आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर पाणी महालावरून पडते. हे पाणी दोन ठिकाणांहून खाली पडते. हे दोन धबधबे नर व मादी या नावाने ओळखले जातात. यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते. हे धरण त्याकाळातील अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या धरणाची लांबी 572 फूट इतकी आहे.

एक दिवस हवाच

किल्ल्यातील दोन मशिदी, अंबरखाना, रंगमहाल, हमामखाना, हत्ती तलाव, हत्ती दरवाजा, रणमंडळ आदी वास्तू आजही पाहावयास मिळतात. रंग महालातही अनेक दालनांचा समावेश आहे. या महालातच गोवळकोंड्याच्या राजकन्येशी दुसरा इब्राहिम आदिलशहाचा विवाह सोहळा थाटात झालेला होता. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्यात आता मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण झाले असून ध्वनी व प्रकाश शो, बोटिंग व वॉटर स्पोर्ट, म्युझिकल फाऊंटन, बाग-बगिचा यामुळे पर्यटकांची संख्या वेगाने वाढत आहे. या किल्ल्याचा व्यवस्थित आनंद घ्यायचा तर यासाठी

काळ्या बसाल्टमध्ये बांधलेली किल्ल्याची मजबूत तटबंदी, त्यातील 114 बुरुज, 1550 फूट उंचीचा स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असलेला नवबुरुज, त्यावर 77 पायर्‍यांनी जाण्याचा अनुभव वेगळ्या विश्वात घेऊन जातो. येथून किल्ल्याच्या चारही बाजूंच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. 

Share: