सोलापूर सोशल फाऊंडेशन

सोलापूर सोशल फाऊंडेशनमध्ये स्वागत

घडावा सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, हाच आहे सोलापूर सोशल फाऊंडेशनचा ध्यास !

सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षित व बुद्धीमान समाजाच्या स्थलांतरामुळे येथे नवीन उद्योग निर्माण होण्याच्या शक्यता कमी होऊ लागल्या, त्याचबरोबर नोकरीच्या संधीही कमी होऊ लागल्या. याचा परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या विकासावर होऊ लागला. याला आळा घातला जावा आणि सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने सोलापूर सोशल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याची प्रगती तेव्हाच होते, जेव्हा त्यातील प्रत्येक खेडे, प्रत्येक गावाची सर्वांगीण प्रगती होते. "सर्वजण एकत्र आले तर सोलापूरची दैवगती एकदम बदलून जाईल" या विचारातून सोलापूर सोशल फाऊंडेशनचा पाया रचला गेला. नफा कमावणे हा संस्थेचा उद्देश नसून सोलापूर जिल्ह्याचा सर्व पातळ्यांवर विकास होणे, हे संस्थेचे ध्येय आहे.


सोलापूर जिल्ह्याची ढासळती स्थिती सावरावी आणि सोलापूर जिल्ह्याचा उत्कर्ष व्हावा या विचारातून 'सोलापूर सोशल फाऊंडेशन'चा जन्म झाला. सोलापूर सोशल फाऊंडेशनचा पहिला टप्पा मुंबईत तर दुसरा पुण्यात सुरू झाला. सोलापूर जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी इच्छुक असणाऱ्यांना एकत्र आणीत सोलापूर सोशल फाऊंडेशन ही संस्था उभी राहिली. या मोहिमेला समाजातील सर्वच स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विविध विचार व सूचनांचे सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे नेहेमीच स्वागत केले जाते. सोलापूर जिल्ह्यातील वैशिष्टये जसे की खाद्यपदार्थ व त्यांचे विपणन, माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग संकुलांची निर्मिती यातून रोजगार निर्मिती होईल व उत्पन्न वाढले की राहणीमानही उंचावेल या विचाराने संस्थेची वाटचाल सुरू आहे.


सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील अध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक, औद्योगिक व कृषी विषयक विविधतेने समृद्ध असलेला असा प्रमुख जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, सोलापूर जिल्ह्याचे धार्मिक महत्व, सोलापूर जिल्ह्याचा संपन्न इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, तसेच सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध रोजगार संधी निर्माण व्हाव्यात हा उद्देश घेऊन ही संस्था वाटचाल करत आहे. सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा सर्वतोपरी विकास घडून यावा यासाठी विविध स्तरातून येणार्‍या सूचना, कल्पनांचे येथे नेहेमीच स्वागत आहे.

आमचे ध्येय

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण, उद्योग, नोकरी व रोजगाराच्या संधी, महिला विकास, स्वच्छता अशा सर्वच आघाड्यांवर सोलापूर जिल्ह्याची प्रगती घडवून आणणे आणि सोलापूर जिल्ह्याला सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे हे सोलापूर सोशल फाऊंडेशनचे लक्ष्य आहे.

सोलापूरच्या विकासासाठी पुढे या

सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्हीही घ्या पुढाकार... आमच्यासह जोडले जा, सभासद बनणे, स्वयंसेवक बनणे किंवा देणगीच्या माध्यमातून तुम्ही या कार्यात सहभागी होऊ शकता. अधिक महितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

आपणा सर्वांना मिळून साधायचा आहे सोलापूर जिल्ह्याचा विकास. तुमचे विचार, संकल्पना, सूचना यांचेही स्वागत. तुमचा सहभाग सोलापूर सोशल फाऊंडेशनसाठी मोलाचा आहे.

आमची उद्दिष्टे

घडावा सोलापूर जिल्हयाचा सर्वांगीण विकास, हाच आहे सोलापूर सोशल फाऊंडेशनचा ध्यास

सोलापूरच्या विकासासाठी आमच्यासह जोडले जा

(+९१) ७७ ६७ ०८ ०९ ९९ या नंबरवर संपर्क साधा

सन्माननीय सभासद

जाणून घ्या मानद संस्थापक सभासदांविषयी...