शिक्षणाच्या संधी

0
शिक्षणाच्या संधी

उत्तम शिक्षण हा भविष्यातील सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजाचा पाया! हे ओळखून सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक तसेच उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे सोलापूर सोशल फाऊंडेशन.

एखाद्या जिल्ह्याचा संपूर्ण विकास तेव्हाच होतो जेव्हा तेथील प्रत्येक गावाचा, प्रत्येक खेड्याचा विकास होतो. विकासाची वाट जाते ती शिक्षणाकडून आणि सुशिक्षित समाजच पुढे सुसंस्कृत समाज बनतो. एका सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास उत्तम शिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन विशेष प्रयत्न करत आहे. समाजाचा काही भाग जरी अशिक्षित राहिला, तरी तेथील विकास खुंटायला सुरुवात होते. गरिबी, कौटुंबिक अडचणी, शिक्षणाच्या पुरेशा आणि चांगल्या सोयी जवळ उपलब्ध नसणे अशी अनेक कारणे समाजात अशिक्षितपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.

शहरी भागाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यातही सर्वप्रथम प्राथमिक शिक्षणाच्या चांगल्या सोयी निर्माण होणे हे संस्थेचे ध्येय आहे. समाजातील सर्व घटकांना चांगले शिक्षण मिळाले तरच संपूर्ण समाजाची प्रगती होईल. अनेकदा कुटुंबाची पार्श्वभूमी शैक्षणिक नसली तर त्या कुटुंबातील पुढच्या पिढीचे शिक्षणही गांभीर्याने घेतले जात नाही. हे टाळणे व शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करणे हेही तेवढेच महत्वाचे.

चांगले शिक्षक चांगले विद्यार्थी घडवतात व हीच पिढी सुशिक्षित समाज घडविते. यामुळे मुलांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणे, शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हेही कार्य महत्वाचे ठरते. सोलापूर सोशल फाऊंडेशन समाजातील सर्व घटकांमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती करणे तसेच सर्वत्र शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी निर्माण व्हाव्यात यासाठी नेहेमीच प्रयत्नशील आहे.