मागील कार्यक्रम

भन्नाट उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यामध्ये पंडित फार्मस् येथे पहिले वहिले 'सोलापूर फेस्ट' नुकतेच संपन्न झाले...

अधिक वाचा

१७ नोव्हेंबर २०१८ रोजी पुण्यामध्ये पंडित फार्मस् येथे सामूहिक अग्निहोत्र संपन्न झाले. अग्निहोत्र ही विविध वैज्ञानिक तत्वांचा एकत्रित उपयोग करून वातावरणाचे शुध्दीकरण करण्याची विशेष अशी एक प्रक्रिया आहे.

अधिक वाचा

'श्रीमंती सोलापूरची' पुस्तक प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरची माहिती आणि महती सांगणारे कॉफी टेबल बुक 'श्रीमंती सोलापूरची' चे पुण्यामध्ये १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशन झाले.

अधिक वाचा

सोलापूरचा सर्वांगीण विकास आणि त्यासाठी पुण्यातील सोलापूरकरांची एकजूट घडवून आणण्याच्या दृष्टीने सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्याला पुण्यातील सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. काल, रविवार दि. १६ डिसेंबर रोजी पंडित फार्मस्, पुणे येथे सहकार मंत्री मा. ना. श्री सुभाष (बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

अधिक वाचा

सोलापूर सोशल फाउंडेशन प्रस्तुत 'शिवरंजनी - तेजोमय स्वर, पहाटगाणी कार्यक्रम पिंपरी (पुणे) येथे पार पडला. यावेळी सुराचा नविन ध्यास, दुष्काळावर मात, भक्तीमय गीते, सोलापूरची श्रीमंतीची गाणी, अशी अनेक सुरेल संगीत गाणी झाली.


अधिक वाचा

'सोलापूर फेस्ट' च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या संस्कृतीचे मुंबईत दर्शन...
सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध उत्पादनांना सोलापूर बाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी मुंबईत आयोजित केलेल्या 'सोलापूर फेस्ट' २०१९ ला दीड लाखाहून अधिक मुंबईकरांनी भेट दिली.


अधिक वाचा

सोलापूर जिल्हा व शहराचे देशपातळीवर ब्रॅंडिंग व्हावे व त्यायोगे प्रगती साधली जावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणार्‍या उपक्रमांपैकी एक म्हणजे 'शॉर्टफिल्म स्पर्धा'. या स्पर्धेमध्ये मोबाईल अथवा कॅमेरा या माध्यमांद्वारे स्पर्धकांना शॉर्टफिल्म बनवायची होती. २६ फेब्रुवारी ही या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख होती. या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल.


अधिक वाचा

सोलापूरचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन निरनिराळे उपक्रम राबवित असते. औद्योगिक विकासातून सोलापूरची प्रगती साधावी असा हेतू ठेवून सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे ४ मार्च रोजी कौशल्य विकसनातून औद्योगिक विकास अभियान राबविण्यात आले.


अधिक वाचा

सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्यातील सर्व गावे समृद्ध आणि विकसित व्हावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन सतत प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन विविध गावांना भेटी दिल्या जातात आणि गावातील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातात.


अधिक वाचा

सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन सदैव कार्यरत आहे. याच विचारातून सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोहोळ येथे १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सरपंच कार्यशाळेत माहिती अधिकारी तज्ञ मा.शिवाजी पवार सरांनी गावामध्ये सरपंचांनी काम कसे करायचे, शाळा डिजिटल कशा प्रकारे करायची, लोक सहभागातून कामे कशी करायची, गावाचे मार्केटिंग कसे करायचे, गावाला जास्त निधी कसा मिळवता येईल, दुष्काळ निवारण यांवर उपाय व काय कामे करायची या बद्दल मोहोळ तालुक्यातील सरपंचांना मार्गदर्शन केले.


अधिक वाचा