सोलापूर फेस्ट - मुंबई

'सोलापूर फेस्ट' च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या संस्कृतीचे मुंबईत दर्शन...

सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध उत्पादनांना सोलापूर बाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी मुंबईत आयोजित केलेल्या 'सोलापूर फेस्ट' २०१९ ला दीड लाखाहून अधिक मुंबईकरांनी भेट दिली. पुण्यानंतर सोलापूर फेस्टचे आयोजन खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. याप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सोलापूरचे ब्रँड अँबॅसिडर, प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर, पनवेलच्या महापौर कविता चौथमल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री.नरेंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती लीना गरड, पनवेल महानगरपालिकेचे गटनेते श्री. परेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सहकार आयुक्त श्री.सतिश सोनी, कोकण विभागाचे उपायुक्त श्री सिध्दराम सालीमठ, पनवेलचे पोलीस उपायुक्त श्री. अशोक दुधे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

मुंबईकरांनी सोलापुरी उत्पादनांच्या खरेदीचा मनसोक्त आनंद या प्रदर्शनात लुटला. या फेस्ट मध्ये साक्षात पंढरीचा पांडुरंग, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सोलापूरचे सिध्देश्वर व तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदीरांची उभारणी करण्यात आली होती. या महोत्सवात टेक्सटाइल, पैठणी, हातमागावर तयार केलेल्या साडया/बेडशीट, महीला बचत गटाच्या वस्तू, पापड, शेवया, कुरड्या, जिल्ह्यातील सेंद्रिय ऊस, गुळ, काकवी, डाळिंब, पेरू, सीताफळ, विविध फळांचे ज्युस, एक वर्ष टिकणाऱ्या नैसर्गिक फुलांचे हार, पूजेचे साहित्य, अक्कलकोट येथील शिवपुरी येथील अग्निहोत्र, हुरडा, विविध टिकाऊ वस्तू, घोंगडी व लोकरीची अन्य उत्पादने, कापडी पिशव्यांचे होलसेल दुकान, स्पेशल चिकन, मटण स्टॉल इत्यादीचा समावेश होता.

विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे/ कविता संग्रहांचे प्रदर्शन करण्यासाठी स्वतंत्र ऑथर्स गॅलरी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे ५०० हून अधिक पुस्तकांचा यामध्ये समावेश होता. या माध्यमातुन सुमारे अडीच कोटीहून अधिक रकमेची उलाढालही येथे झाली.

पुण्यातील सोलापूर फेस्टला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर इतर शहरांमध्येही फेस्टचे आयोजन करण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी होऊ लागली. पुण्याप्रमाणेच मुंबई येथे नागरिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हे या फेस्टचे यश आहे. महाराष्ट्रात अन्यत्रही लवकरच अशा फेस्टचे आयोजन केले जाईल.

Share: