कौशल्य विकास

0
कौशल्य विकास

सोलापूर जिल्ह्यामधील जनतेच्या अंगभूत कौशल्यांना चालना देणे, त्यासाठी योग्य प्रशिक्षण पुरविणे यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन कार्यरत आहे.

सोलापूर जिल्हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हातमागावर विविध वस्त्रे विणण्याचा उद्योग येथे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणावर चालत असे, त्याचबरोबर येथे विडी उद्योगही मोठ्या प्रमाणात चालत असत. कापड उद्योग आणि विडी उद्योग यांबरोबर शिल्पकला, हस्तकला, लाकूडकाम हे उद्योगही येथे मोठ्या प्रमाणात चालत असत.

विविध कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील समाजाचे स्थलांतर होऊ लागले, त्यात सोलापुरातील कौशल्य असणारा समाजही कमी होऊ लागला. आणि अर्थातच याचा परिणाम येथील उद्योग जगतावर झाला. आजही सोलापूर जिल्हा कापड उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे. आता कापड यंत्रमागावर विणले जाते परंतु आजही येथे काही प्रमाणात का होईना, पण हातमागावर वस्त्रे विणणारे कुशल कारागीर बघावयास मिळतात. आजही येथील हातमागावर विणलेल्या साड्या, वस्त्रे, घोंगड्या विशेष लोकप्रियता मिळवून आहेत.

कापड उद्योग असो किंवा इतर कला कौशल्याची कामे, आज सोलापूर जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी या कुशल कारागिरांचा विकास होणे अतिशय आवश्यक आहे. नव्या पिढीमध्ये असणाऱ्या विविध अंगभूत कौशल्यांना चालना देणे अतिशय गरजेचे आहे. यातून अनेक गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला जपली जाईल, सोलापूर जिल्ह्यातील लहानमोठे व्यवसाय व उद्योग वाढू लागतील, तसेच रोजगार निर्मितीही होईल. यासाठी जिल्ह्यातील तरुणांमध्ये असणारे हे गुण ओळखून सोलापूर सोशल फाऊंडेशन कौशल्य विकासावर भर देत आहे.