शिवयोगी, तत्वचिंतक थोर वचनकार सिध्दराम

शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत. हे सत्पुरूष 11 व्या शतकाच्या सुमारास सोलापुरात होऊन गेले. ते वीरशैव पंथाच्या शून्यसिंहासनाचे तिसरे उत्तराधिकारी होते. त्याचप्रमाणे गाणपत्य व शाक्त पंथाचे पुरस्कर्ते असल्यामुळे सोलापूर परिसरात त्यांनी अष्टविनायक व अष्टभुजादेवी स्थापन केल्या. सोलापूर शहरात त्यांनी विविध ठिकाणी 68 लिंगांची स्थापना केली. त्यांनी कन्नड भाषेतील 68 हजार वचनांची निर्मिती केली. त्यातील 1379 वचने आज उपलब्ध आहेत. प्रत्येक वचनाच्या शेवटी कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाचे स्मरण आढळते.

दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात वीरशैव पंथाच्या भक्तांची संख्या लक्षणीय आहे.

सोलापुरातील श्रीसिद्धेश्वर मंदिर आणि परिसर अतिशय सुंदर आहे. अमृतसरचे सुवर्णमंदिर जसे चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे, तशाच प्रकारची रचना येथे आहे. हे मंदिर सुवर्णमंदिरापेक्षा 300 वर्षे जुने आहे. उगवत्या सूर्याचे प्रतिबिंब ज्यावेळी पाण्यात पडते, त्यावेळी या तलावाच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते. रात्रीच्या वेळी जेंव्हा मंदिरावर विद्युत रोषणाई केली जाते, तेंव्हा त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. दरवर्षी जानेवारी महिन्यात सोलापुरात ग्रामदैवत श्रीसिद्धरामेश्वरांची यात्रा भरते. ही यात्रा पाहण्यासाठी व दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतून भाविक येथे येतात. रोज सुमारे दोन-चार लाख लोक उपस्थित असतात. आणि ही यात्रा जवळजवळ तीन आठवड्यांपर्यंत सुरू असते. लोकसभागांतून ङ्गसुवर्ण सिद्धेश्वरफ संकल्पना राबवण्यात येत आहे.

Share: