मनमोहक, देखणे इंद्रभुवन

एकेकाळी महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आणि देशात बाराव्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरच्या सौंदर्यात भर घालणारी महानगरपालिकेची सुबक नक्षीकाम असलेली अत्यंत रेखीव, मनमोहक, देखणी इमारत म्हणजे इंद्रभुवन होय. 1899 मध्ये पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांनी या इमारतीचे बांधकाम सुरू केले. अनेक स्थापत्य शास्त्रांच्या प्रमाणबद्ध मिश्रणातून साकार झालेली सुमारे 15 हजारपेक्षा जास्त चौरस फुटांची ही भक्कम साजिरी इमारत शहराच्या मध्यवर्ती भागात उंचावर मोठ्या डौलाने उभी आहे. जगभरातील उत्कृष्ट इमारतींमध्ये त्याकाळी वापरण्यात आलेले अत्याधुनिक बांधकाम साहित्य या इमारतीत वापरले आहे. बांधण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी लागला. जगभरातील अनेक देशात अप्पासाहेब वारद यांनी दौरे करून या इमारतीसाठी लागणाार्‍या सुबक आणि आकर्षक वस्तू आणल्या.  याशिवाय सोलापुरात पोस्टाचे मुख्य कार्यालय, पासपोर्ट कार्यालय, लक्ष्मी मंडई अशा अनेक ऐतिहासिक वास्तू सुस्थितीत आहेत.

इंद्रभुवनच्या प्रत्येक खांबावर सिंह व वाघांची प्रतिकृती आहे.

इमारतीत देवता, प्राणाी, फळे आणि नृत्य करणार्‍या महिलांचे शिल्प कोरले आहेत.

इंद्रभुवनच्या निर्मितीत 1 हजाराहून अधिक कारागिरांचा सहभागा होता.

सोलापूरचे नाना शंकरशेठ अशी ओळख असणारे अप्पासाहेब वारद यांचा पूर्णाकृती पुतळा इंद्रभुवन इमारतीसमोर आहे.

Share: