दक्षिण भारताचे महाद्वार

सोलापूर हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले आहे. त्यामुळे ते दक्षिण भारताकडे जाणार्‍या मार्गावरचे पहिले मोठे स्थानक आहे. म्हणूनच त्याला दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणतात. भारतातल्या सर्वात मोठे उत्पन्न असलेल्या पहिल्या 100 स्थानकांतले एक महत्त्वाचे स्थानक आहे. 1 फेब्रुवारी 1870 मध्ये सोलापूर ते गुलबर्गादरम्यान रेल्वेमार्ग टाकण्यात आला.

सोलापूर रेल्वे विभाग शहर आणि जिल्हाच्या विकासाचे मूलभूत चक्र आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई यांना सुवर्ण चतुष्कोण म्हणून ओळखले जाते. मुंबई ते चेन्नई मार्गावरचे सोलापूर स्थानक हे एक महत्त्वाचं स्थानक आहे. 1 फेब्रुवारी 1870 मध्ये सोलापूर ते गुलबर्गादरम्यान रेल्वेमार्ग टाकण्यात आला. आजच्या घडीला सोलापूर स्थानकावरून रोज 86 रेल्वे धावत आहेत. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून सोलापूर स्थानकाला ओळखले जाते. एकट्या सोलापूर स्थानकावरून रोजी वीस ते पंचवीस हजार प्रवाशांची वाहतूक सुरू असते. प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांची संख्या वाढत आहे.

सोलापूरची ओळख आता सिमेंट हब अशी ओळख होवू पाहतंय. होटगी स्थानकाच्या परिसरात बिर्ला सिमेंट फॅक्टरी, एनटीपीसी प्रकल्प, चेट्टीनाड, जुआरी सिमेंट कारखाना उभारला गेल्याने रेल्वेद्वारे मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. या कारखान्याचे सायडिंग तिलाटी, होटगी स्थानकावरून गेले. रेल्वे सुविधा सक्षम असल्याकारणानेच याचे कारखाने सोलापूर परिसरात सुरू झाले.

Share: