राष्ट्रीयता जागवणारे शिवस्मारक

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या घटनेस 1946 मध्ये 300 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने धर्मवीर वि. रा. पाटील, भा. वा. मुळे, राजाभाऊ राजवाडे, रावसाहेब निंबर्गीकर, नागप्पाअण्णा अबदुलपूरकर आणि नारायण जाधव यांनी तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी शिवस्मारक ही संस्था सुरू केली. त्यासाठी जागा खरेदी केली. 1979 पासून हे काम पुन्हा जोमाने सुरू झाले. शिवस्मारकमध्ये तरुणांसाठी अत्याधुनिक उपकरणांनी युक्त सुसज्ज व्यायामशााळा सुरू केली. देशभक्ती गीत स्पर्धा, व्याख्यानमाला, वाचनालय, किल्ले स्पर्धा असे अनेक उपक्रम सुरू झाले.1997 मध्ये महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. त्यानंतर शिवशिल्प प्रकल्प पूर्ण केले.

बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे श्री छत्रपत्री शिवाजी महाराज स्मारक. मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक प्रेरणास्थान आहे.

चहूबाजूंनी व्यापारी गाळे आणि मध्ये भव्य पटांगणात उंचावर भव्य मूर्ती स्वाभिमान जागवते. सिंहासनारूढ मूर्तीच्या भोवताली महाराजांच्या जीवनीवर आधारित शिल्पप्रदर्शन आहे.

रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस, रज्जूभय्या व कुप्प सुदर्शन यांनी अनुक्रमे कोनशिला, पुतळा स्थापना, शिवशिल्पांचे अनावरण केले.

आधुनिक उपकरणांनी युक्त सुसज्ज व्यायामशाळा येथे आहे. मुलांना लहान वयापासूनच बलसंवर्धनाची रूची लागावी यासाठी येथे अनेक उपक्रम सुरू असतात.

Share: