हत्तरसंग कुडल - मराठीतील पहिला शिलालेख

या मंदिरात एक मूर्ती आहे. तिच्या मुखावर दर वर्षप्रतिपदेला सूर्योदय होताच पहिले किरण पडते. मराठीतला पहिला लिखित शब्द ङ्गवाचिता विजयी होईजेफ हा याच मंदिरातल्या एका दगडावर कोरलेला आहे. हा शिलालेख  लिहून 2018 मध्ये एक हजार वर्षे पूर्ण झाली.

हत्तरसंग कुडल हे नव्याने विकसित जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असून, ते भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर आहे. या ठिकाणी दोन मध्ययुगीन शिवमंदिरे आहेत. त्यातले एक मंदिर हरिहरेश्वर तर दुसरे मंदिर

संगमेश्वर. सभामंडप, आलेख, अंतराळ, गर्भगृह, हरिहरेश्वर मंदिर, स्वर्गमंडप आणि रंगमंडप या कलाकृती मनाला आश्चर्य वाटावे अशा आहेत.

या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उत्खननात जगातील एकमेव असे साडेचार टन वजनाची एक शिवपिंड सापडली. त्यावर 365 शिवमूर्ती कोरलेल्या आहेत.

पुरातत्त्व खात्याने हरिहरेश्वर मंदिराची मूळ रचना तशीच ठेवत हे मंदिर नव्याने उभारले आहे. उत्खननात सापडलेल्या एखाद्या वारशाची सुमारे 4 कोटी रुपये खर्चून पुन्हा उभारणी केली जाणे, ही दुर्मिळ घटना आहे. प्राचीनता आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

मराठी भाषेतील पहिला शिलालेख येथे आढळला आहे. 2018 मध्ये या शिलालेखास 1000 वर्षे पूर्ण होत आहेत. यावरून मराठीचा उगम किमान 1 हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे सिद्ध होते.

अकराव्या शतकात बांधलेली (कोरलेली) हरिहरेश्वर व संगमेश्वर ही अजिंठा-वेरुळची लेणी वेरुळच्या शिल्पकलेशी साम्य असलेली महादेव मंदिरे आहेत. या ठिकाणी उत्खननात जगातील एकमेव असे दुर्मिळ शिवलिंग सापडलेले आहे. या 4 फुटी शिवलिंगावर शिवाची 359 मुखे व अन्य मूर्ती कोरल्या आहेत.

Share: