सिध्दरामांचे जन्मस्थान

शिवयोगी सिद्धरामांचे जन्मस्थान साखरपेठ परिसरात आहे. कन्ना चौकातून कोंतम चौकाकडे जाताना पद्मा टॉकीजच्या शेजारील बोळात हे सिद्धरामेश्वरांचे जन्मस्थान आहे. स्वन्नलगी मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराच्या आतल्या गाभार्‍याची वास्तू ही प्राचीन आहे. याच जागेत सिद्धेश्वर महाराजांचा जन्म झाल्याचे मंदिरातील आतील बाजूस असलेल्या पाटीवर नमूद केले आहे. आजही अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सिद्धरामाला नवस बोलून साकडे घालतात.

Share: