मुद्दगौडा व सुग्गलादेवी या दांपत्यापोटी सिद्धरामांचा जन्म झाला. बाल सिद्धरामांचे जीवन वैशिष्ट्यपूर्ण आहे. बालपणी ते नेहमी एकांतवासात ध्यानमग्न असत. आता जिल्हा परिषद आहे तो भाग त्याकाळी शेतीचा होता. एके दिवशी गायी चारत असताना बाल सिद्धरामांना एक वयोवृद्ध जंगम भेटला. त्याने आपली ओळख ङ्गश्रीशैल मल्लय्याफ अशी करून दिली. ही भेट झाली ते ठिकाण आज ङ्गगुरू भेटफ या नावाने प्रसिद्ध आहे. मल्लय्याने बाल सिद्धरामांना दहिभात मागितला. घरी जाऊन दहिभात आणल्यावर मल्लय्या तेथे नव्हते. त्यानंतर मल्लय्यांचा शोध घेत कावडी भक्तांसोबत आंध्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्रीशैल मल्लिकार्जुन येथे पोहोचले. तेथे त्यांनी तपश्चर्या व ज्ञानसाधना केली. मल्लय्यांचा साक्षात्कार झाला. तेथून आल्यावर त्यांनी 68 हजार वचने लिहिली. या वचनांतून त्यांनी समाजप्रबोधन केले. शिवभक्तीचा प्रसार केला. श्रमदानातून तलावनिर्मिती केली.